चिखलीतील उच्चशिक्षित नवदाम्पत्याच्या आत्महत्येप्रकरणी मुलाच्या भावाला अटक

एमपीसी न्यूज – चिखलीतील उच्चशिक्षित नवदाम्पत्याच्या आत्महत्येप्रकरणी मुलाच्या भावाला अटक करण्यात आली आहे. तर, आईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 19 फेब्रुवारीला रात्री आठच्या सुमारास चिखली येथे उघडकीस आली होती.

 

अभिजीत विलास ढमाले (वय 25, रा. साने चौक, चिखली) याला अटक करण्यात आली आहे. तर, आई विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत विलास ढमाले (वय 25) व अश्विनी अनिकेत ढमाले (वय 22) असे आत्महत्या केलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी अश्विनीचे वडील संभाजी गायकवाड (वय 48, रा. चांदखेड, मावळ) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

अनिकेत हा मेकॅनिकल इंजिनिअर तर अश्विनी ही फॅशन डिझायनर होती. त्यांचे 13 महिन्यांपूर्वीच एक जानेवारी 2016 ला त्यांचे लग्न झाले होते. अश्विनीला तीचा दीर अभिजीत आणि सासू घरगुती कारणावरून छळ करून तिला आणि नवरा अनिकेत याला मानसिक त्रास देत होते. 17 फेब्रुवारी रोजी दीर अभिजीत याने अश्विनीला मारहाण केली होती. 19 फेब्रुवारी रोजी घर झाडण्याच्या कारणावरून सासूने अश्विनीला शिवीगाळ केली होती. तसेच घरातून बाहेर काढण्याची धमकी दिली होती. 

 

अश्विनी आणि अनिकेत यांना हे सहन न झाल्याने त्यांनी राहत्या घरात फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या करत असल्याबाबतचे पत्र लिहून गायकवाड यांच्या मुलाच्या मोबाईल व्हॉट्सअॅपवर पाठविले होते. दीर अभिजीत आणि सासूने आत्महत्या पत्र घटनास्थळावरून नष्ट केले आहे, असे फिर्यादीत नमूद केले आहे. निगडी ठाण्याचे फौजदार ए. एम. आठरे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.