गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

पुण्यात हरिहरेश्वर महोत्सवची उत्साहात सांगता

एमपीसी न्यूज – पुण्यातील हरिहरेश्वर मंडळातर्फे महाशिवरात्रीचे औचित्य साधून हरिहरेश्वर महोत्सव नुकताच पार पडला. हरिहरेश्वर मंडळ व सर्वोत्कर्ष चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम हरिहरेश्वर मंदिर, शनिवार पेठ येथे पार पडले.

 

या महोत्सवाची ‌‍सुरुवात ज्ञानेश्वर पंडित यांच्या सनई वादनाने झाली. त्यानंतर रुद्रपठण कालिंदी दाणी आणि सहकारी यांनी केले. त्याचबरोबर शिवस्तुती – अश्विनी गाडगीळ व सहकारी यांनी सादर केले. स्नेहल दामले आणि सहकारी यांनी भजनांचा कार्यक्रम सादर केला. श्रीराम साठे यांच्या शिष्य परिवाराने त्यांना श्रद्धांजली म्हणून भक्तिसंगीत कार्यक्रम सादर केला. महोत्सवाची सांगता गायक राजेश दातार आणि यांचे सहकारी यांनी केली. अनेक भक्तिगीतांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

 

यापैकी प्रामुख्याने दातार यांनी गायलेली राधेतुला या गवळणीला दाद मिळाली त्याच बरोबर ‘कानडा राजा पंढरीचा’ चदरिया झिनी रे झिनी आणि नवीन संगीत दिलेले ओमनम:शिवाय या महाशिवात्रनिमित्त तयार केलेल्या रचनेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

अर्चना खासनीस यांनी गणपतीचे गाणे व भावगीते सादर केली. नवोदित कलाकारांना व्यासपीठ देण्याच्या हेतूने ट्रस्टने भाग्यश्री गोसावी व चेतन सोनावणे यांनाही कला सादर करण्याची संधी देण्यात आली. त्यांनीही उत्तम गाणी सादर केली. रवींद्र खासनीस यांनी तबल्याच्या समर्पक साथ केली. जयंत साने यांनी हार्मोनियमवर तर महेश जोजारे यांनी पखावजवर तर मुकुंद जोशी यांनी टाळावर उत्तम साथ दिली.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व निवेदन शरद महाबल यांनी केले. नवनिर्वाचित नगरसेवक हेमंत रासने यांनी आवर्जून हजेरी लावली होती त्यांना मंडळातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.

Latest news
Related news