शुक्रवार, सप्टेंबर 30, 2022

हॅरीस पुलावरुन नदीपात्रात उडी मारलेल्या तरुणीला नागरिकांनी वाचवले

 
एमपीसी न्यूज – बोपीडी येथील हॅरीस पुलावरुन नदीपात्रात उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या एका तरुणीला कामगारांनी आणि सुरक्षारक्षकांनी जीवनदान दिले. ही घटना आज (रविवारी) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. 
 
तरुणी पिंपरी, संत तुकारामनगर येथील रहिवाशी आहे. तिच्यावर बोपोडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 
 
रविवारी सकाळी बोपोडी येथील हॅरीस पुलावरुन  एका 18 वर्षाच्या मुलीने नदीपात्रात उडी मारली. पुलाचे काम करणा-या कामगारांनी आणि सुरक्षारक्षकांनी मुलीने उडीमारल्याचे पाहिले. त्यांनी लगेच नदीपात्रात उडी मारुन तिला बाहेर काढले. त्यामध्ये ती जखमी झाले आहे. तिच्यार बोपोडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे, खडकी पोलिसांनी सांगितले.  
कामगारांच्या आणि सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे मुलीचे प्राण वाचले. खडकी पोलीस व मुलीचे वडील घटनास्थळी आले आहेत.
spot_img
Latest news
Related news