निगडीत दहावीच्या परिक्षेच्या दडपणातून विद्यार्थ्याची आत्महत्या

एमपीसी न्यूज – दहावीच्या परिक्षेच्या अभ्यासाचे दडपण आल्याने विद्यार्थ्याने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार शनिवारी (दि.25) रात्री साडेआठच्या सुमारास निगडीतील, त्रिवेणीनगर येथे उघडकीस आला.

अथर्व संतोष पाटील वय (वय 16, रा. त्रिवेणीनगर, निगडी), असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

अथर्व हा दहावीच्या वर्गात शिकत होता. काही दिवसावर दहावीची परीक्षा येऊन ठेपली आहे. परिक्षेचे  त्याच्यावर दडपण होते. अथर्व शनिवारी त्याच्या खोलीमध्ये अभ्यास करत बसला होता. रात्री उशीर झाला तरी त्याने दरवाजा उघडला नव्हता. त्यामुळे घरच्यांनी दरवाजा ठोठवला असता आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा तोडला असता अथर्व गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

दहावीच्या परिक्षेचे दडपण असल्याने आत्महत्या करत असल्याचे त्याने चिठ्ठीत लिहिले, असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.