शनिवारवाडा ते विधानभवनावर अभविपचा छात्र क्रांती मोर्चा

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने शनिवारवाडा ते विधानभवनावर शैक्षणिक समस्या बाबत छात्र क्रांती मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये शहरातील विविध भागातील विद्यार्थी  मोठ्या संख्येने सहभागी झाले.

 

या विषयी अभविपचे प्रदीप गावडे म्हणाले की, सद्यस्थितीला शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक समस्येला तरुणवर्गाला सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सरकारी नोकर भरतीवरील बंदी त्वरित उठविण्यात यावी. भरतीसाठी प्रतिक्षा यादी लावण्यात यावी. तलाठी भरती परीक्षा एमपीएससी मार्फत मोफत घेण्यात यावी. राज्य शासन आणि पुणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात 100 अभ्यासिका सुरु करण्यात याव्यात. त्याचबरोबर पुण्यात 15 शासकीय वसतिगृहे लवकरात लवकर सुरु करण्यात यावी. तसेच त्यातील वसतिगृहे यूपीएससी आणि एमपीएससी ची तयारी करणाऱ्या गरीब,होतकरू विद्यार्थीसाठी असावीत. या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.

तसेच या मागण्याची दखल न घेतली गेल्यास भविष्यात तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.