वडगाव-खडकाळा गटातील भाजप पदाधिका-यांचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा

पक्षविरोधी काम करणा-यांवर कारवाईची मागणी

एमपीसी न्यूज – वडगाव-खडकाळा गटातील ग्रामीण भागातील 18 गावामधील सरपंच, उपसरपंच, सदस्य व पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी तालुकाध्यक्षांकडे पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या वडगाव – खडाकाळा गटातच पक्षाचे उमेदवार रामनाथ वारींगे यांना पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाची कारणे शोधण्यासाठी, तसेच वडगाव शहरी भागातून त्यांना अपेक्षित मतदान न झाल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली.  तसेच मागणी पूर्ण होईपर्यंत काम न करण्याचा निर्णय राजीनामा दिलेल्यांनी घेतला आहे.

या पराभवात गटातील शहरी भागातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम न केल्याचा ठपका ठेवत  महिला आघाडीच्या अध्यक्षा नंदाताई सातकर, कामशेतचे सरपंच, उपसरपंच, कान्हे ग्रामपंचायत सदस्य, वडगाव -खडकाळा गण, गट अध्यक्ष, रामनाथ वारींगे, सांगवी गावचे बारकु खांदवे, यशवंत खांदवे, खंडूजी खांदवे आदी कार्यकर्त्यांनी, कान्हे, कामशेत, नायगाव, साते, जांभूळ, सांगवी, कुसगांव, अहिरवडे, चिखलसे, साई, नाणोली, पारवडी, वारंगवाडी, आंबी, राजपुरी आदी गावातील पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी महिला अध्यक्षा नंदाताई सातकर यांच्या अध्यक्षतेखाली कान्हे येथील पत्रकार परिषदेत राजीनामे दिले.

यावेळी वारिंगे म्हणाले की, विरोधी उमेदवारांकडून पराभव पत्करावा लागला असता; तर एवढे वाईट वाटले नसते, जेवढे घरभेद्यांनी विरोधी काम करून पराभव केला. ही अत्यंत खेदाची बाब आहे. अशा घरभेद्यांवर तातडीने कारवाई न केल्यास पक्षासाठी फार मोठा धोका होऊ शकतो. "

वडगाव गणातील भाजप उमेदवारापेक्षा गटातील उमेदवार वारींगे हे 1600 मतांनी पिछाडीवर आहे. याचा अर्थ पक्ष विरोधी काम केल्याने वारींगे यांचा पराभव झाला. पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत पक्षाचे काम करणार नाही, असा पवित्रा यावेळी सर्वांनी घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.