हिंजवडीत डोक्यात दगड घालून सास-यांकडून जावयाची हत्या

एमपीसी न्यूज – पती-पत्नीची भांडणे सोडविण्यास गेलेल्या सास-याने माझ्या पोरीला का मारतोस, असे म्हणत जावयाच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. ही घटना रविवारी (दि.26) रात्री नऊच्या सुमारास जांभेगाव, मुळशी येथे घडली.

शहादेव ओमकार माळी (वय 33, रा. जांभेगाव, मुळशी) असे हत्या झालेल्या जावयाचे नाव आहे. या प्रकरणी सासरे भाऊसाहेब साहेबराव राजपूत (वय 54) यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शहादेवची बहीण मंगला विलास दळवी (वय 30, रा. जांभेगाव, मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शहादेव हा आरोपी भाऊसाहेब राजपूत याचा जावाई होता. ते सगळे जांभे येथे एकत्र राहत असून वीटभट्टीवर काम करत आहेत. रविवारी रात्री नऊच्या सुमारास अंजना आणि शहादेव या पती-पत्नीची भांडणे सुरू होती. त्यावेळी भाऊसाहेब हा भांडणे सोडविण्यासाठी गेला. त्याने शहादेव याला ‘काय रे तुला माज आला आहे का, माझ्या पोरीला का मारतोस, असे म्हणत शहादेवच्या डोक्यात दगड मारला. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हिंजवडी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.बी.पाटील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.