शहरात विविध संस्थांतर्फे मराठी भाषा दिन साजरा

एमपीसी न्यूज – पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात विविध सामाजिक संस्थानी मराठी भाषा दिन विविध कार्यक्रमांनी साजरा केला. मराठी  भाषा  दिनानिमित्ताने  कुदळवाडी  येथे महेश दादा लांडगे  युवा मंचच्या वतीने  मराठी  भाषेचे  संर्वधन व्हावे  यासाठी कुदळवाडीतील दुकानदार, लघुउद्योजक, यांना गुलाबपुष्प  देऊन  आपल्या दुकानावर मराठी पाट्या लावावे हे   आवाहन करण्यात आले, आपण आपली भाषा टिकवने हे आपले पहिले कार्य आहे.

महेश दादा लांडगे युवा मंचच्या या आवाहनाला  व्यावसायिकांनी प्रतिसाद दिला. अशा अनोख्या पद्धतीने मराठी भाषा दिन  साजरा  करण्यात आला. यावेळी मंचाचे अध्यक्ष दिनेश यादव, राजेश  गायकवाड, बालाजी पांचाळ, अमित जाधव, किशोर  लोंढे, नंदीप खरात हे उपस्थित होते.

मराठी  भाषा  गौरव  दिनानिमित्त राज्य महामंडळ पिंपरी-चिंचवड  एस. टी. आगाराच्या वतीने  प्राध्यापक बाबासाहेब शेंडगे यांच्या  हस्ते  कविवर्य  कुसुमाग्रज  यांच्या  शब्द  पुष्पांजली  फलकाचे  अनावरण  करण्यात आले. यावेळी  आगार प्रमुख अनिल भिसे, गझलकार म. भा. चव्हाण, संजय मेस्त्री, संजय सिंघा लवार, विनोद अष्टुळ, ज्ञानेश्वर मलशेट्टी, जनार्दन लोंढे, हेमंत खामकर, चंद्रा भोकटे, शिवकन्या  थोरात, आर. जी . जाधव, रघुनाथ गेंगजे, विजय कदम, महेंद्र धांडे, मदन नवगिरे, प्रवीण मोहिते, प्रदीप गायकवाड, माऊली मलशेट्टी आदी उपस्थित होते.

यानिमित्त स्थानकाची स्वच्छता करण्यात आली, स्थानकात रांगोळी व फुलांची सजावट करण्यात आली होती. प्रत्येक प्रवाशाला मराठी भाषेतील साहित्याची ओळख व्हावी, मराठी भाषेचा गोडवा कळावा यासाठी मराठी भाषेतील साहित्याच्या पुस्तकांचे व गुलाबपुष्पांचे वाटप करण्यात आले.

चिंचवड येथील प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. याचे उद्घाटन डॉ. अविनाश आवलगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. राजेंद्र कांकरिया अध्यक्षस्थानी होते. यावेळी डॉ. दीपक शहा, प्रा. वनिता कु-हाडे, प्रा. सुरेखा कुंभार आदी उपस्थित होते.

एमपीसी न्यूज या मराठी न्यूज वेबपोर्टलचे संपादक विवेक इनामदार यांचा सामाजिक कार्यकर्ते विक्रम पवार यांनी मराठी भाषा दिनानिमित्त पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. पिंपरी-चिंचवडमधील अग्रगण्य असणारी ही न्यूज संस्था आहे. त्याबद्दल तिचा गौरव त्यांनी केला. यावेळी रोहित खर्गे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.