केरळमधील संघाच्या कार्यकर्त्यांवरील प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ पिंपरीत बुधवारी आक्रोश सभा

एमपीसी न्यूज – पिंपरीतील लोकतंत्र बचाव संघाच्या वतीने आक्रोश सभा आयोजित केली आहे. केरळमधील संघाच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ले व हत्या याच्या निषेधार्थ ही सभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती रविकांत कळंबकर यांनी दिली.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे बुधवारी 1 मार्चला सायंकाळी  साडेपाच वाजता करण्यात येणार आहे.  मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीकडून संघाच्या कार्यकर्त्यांची निर्घुण हत्या करण्याची परंपरा ही काळीकुट्ट बाजू केरळची दुसरी ओळख तयार झाली आहे. एकूण 14 जिल्ह्यांपैकी 10 जिल्ह्यात अशा हिंसात्मक घटना घडल्या. या सर्व दुष्कृत्यांचा निषेध करण्यासाठी हे प्राणघातक हल्ले बंद करण्यासाठी ही आक्रोश सभा आयोजित केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.