भारतीय जैन संघटनेच्या पिंपरी-चिंचवड नवनिर्वाचित कार्यकारिणीचा शपथविधी

एमपीसी न्यूज – भारतीय जैन संघटना पिंपरी-चिंचवड शहर विभागाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा शपथविधी कार्यक्रम नुकताच पार पडला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे विभागीय अध्यक्ष राजेंद्र सुराणा होते. नवीन कार्यकारिणी सदस्यांना राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारेख यांनी शपथ देऊन सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी संदेश सुरेश गादिया, उपाध्यक्षपदी दिलीप भंसाळी, व विरेश छाजेड यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमासाठी उपस्थितांचे आभार उपाध्यक्ष विरेश छाजेड यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.