इंटरनेटची वायर कट केल्याचा जाब विचारणा-याला टोळक्याची मारहाण

एमपीसी न्यूज – इंटरनेट कनेक्शनची वायर कट केल्याचा जाब विचारणा-याला पाच जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि.24) दुपारी एकच्या सुमारास मोरेवस्ती, चिखली येथे घडली.

याप्रकरणी नेताजी दादाराव काशीद (वय 46, रा. मोरेवस्ती, चिखली), सुमंत तांबे (वय 32), मंगेश तांबे (वय 18), योगेश तांबे (वय 26), राजेंद्र धनराज वायसे (वय 22) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अनुप पोपट भोईटे (वय 27, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी भोईटे आणि आरोपी काशीद यांचा केबलचा व्यवसाय आहे. शुक्रवारी दुपारी भोईटे हे काशिद यांच्याकडे  इंटरनेटची वायर तोडल्याबाबत विचारणा करण्यास गेले होते. त्यावेळी काशिद याने भोईटे यांना कार्यालयात नेले. काशिद याने मंगेशला रॉड आणण्यास सांगितले. सुमंत याने भोईटे यांना खाली पाडले आणि काशिद याने भोईटे यांना रॉडने मारहाण केल्याचे, पोलिसांनी सांगितले.

भोईटे यांचे साथीदार योगेश कांबळे व निलेश भालेकर सोडविण्यासाठीमध्ये आले असता आरोपी सुमंत याने योगेश याला लोखंडी रॉडने मारहाण केली. तर, राजेंद्र वायसे याने निलेश भालेकर याला शिवीगाळ करत बघून घेण्याची धमकी देत मारहाण केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. निगडी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. सोनवणे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.