गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

धायरीत बहिणीला त्रास देणा-या मेहुण्याची निर्घृण हत्या; तिघांना अटक

एमपीसी न्यूज – बहिणीला त्रास देणा-या मेहुण्याची हत्या करून मृतदेह कॅनॉलमध्ये टाकल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (27 फेब्रुवारी) सकाळी उघडकीस आला. धायरी परिसरातील गोयल गंगाजवळ ही घटना घडली. सिंहगडरोड पोलिसांनी कसून तपास करत हत्येचा उलगडा केला आणि तिघांना अटक केली.

अशोक रामबाबू सिंग (वय 35, रा. गोयलगंगा कॅम्पस, मूळ. बिहार), असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी मयताचा मेहुणा मिथून बिगू सिंग (वय 18), धीरज राम सिंग (वय 21) व रुपेश राम आशिष सिंह (वय 23, रा. सर्व रा. गोयलगंगा कॅम्पस, मूळ बिहार) यांना अटक करण्यात आली.

आरोपी आणि मयत हे बिगारी कामे करतात. सध्या ते गोयल गंगा कॅम्पस येथे राहण्यास होते. कोल रात्री  गोयल गंगा कॅम्पसच्या पाठीमागे असणार्‍या मोकळ्या जागेत आरोपी व मयत मद्यपानासाठी बसले होते. मद्यपान केल्यानंतर त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी आरोपींनी अशोक सिंग याच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण हत्या केली. त्यानंतर त्याच्या मृतदेहा जवळच असणार्‍या कॅनॉलमध्ये टाकून दिला व पसार झाले.

घटनेबाबत सोमवारी सकाळी पोलिसांना कॅनॉलमध्ये मृतदेह असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाईवाला सुरुवात करत बिहार येथे पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला अटक केली. आरोपी मिथून याच्या बहिणीसोबत अशोक सिंग याचे लग्न झालेले आहे. लग्नानंतर अशोक सिंग हा पत्नीला त्रास देत होता. त्यामुळे त्यांच्यात सतत वाद होत होते. मिथून व अशोक याच्यांतही वादावादी झाली होती. त्यामुळे आरोपींनी त्याची हत्या केली.

Latest news
Related news