इन्फोसिस, टीसीएस संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

पहिली नेटसर्फ कॉर्पोरेट व्हॉलिबॉल अजिंक्यपद 2017 स्पर्धा

एमपीसी न्यूज – स्पोर्ट आय लव्ह व महाराष्ट्र क्रीडा आयोजित पहिल्या नेटसर्फ कॉर्पोरेट व्हॉलिबॉल अजिंक्यपद 2017 स्पर्धेत पुरूष व महिला गटात इन्फोसिस व टीसीएस या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

सिम्बायोसिस स्कूल सेंटर, प्रभात रोड येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत  पुरूष गटात इन्फोसिस संघाने नेटसर्फ संघाचा 2-0 (25-13, 25-22), असा दोन सेटमध्ये पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. केतन सणसच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर नेटसर्फ संघाने सिनेक्रॉन संघाचा 2-1 (20-21, 25-21, 15-5) असा तीन सेटमध्ये पराभव केला. अॅमडॉक्स्‌  संघाने कॅपजेमिनी संघाचा 2-1 (17-25, 26-24, 15-6), असा तीन सेटमध्ये पराभव करत आगेकूच केली.

टीसीएस संघाने फोर्ब्स मार्शल संघाचा 2-0 (25-4, 25-7), असा तर टेक महिंद्रा संघाने टाटा टेक्नॉलॉजी संघाचा 2-0 (25-18, 25-14) असा तर बाएनवाय मेलन संघाने आपल्या विजयी मालिकेत सातत्य राखत हमिंगबर्ड संघाचा 2-0 (25-17, 25-17) असा एकतर्फी पराभव करून स्पर्धेत आगेकूच केली.

महिलांच्या गटात इन्फोसिस संघाने आपल्या धडाकेबाज कामगिरी करत अनुक्रमे कॅपजेमिनी संघाचा 2-0 (25-15, 25-11) असा, टीसीएल संघाचा 2-0 (25-7,25-5) असा तर टीसीएस संघाचा 2-0 (25-22, 25-22) असा पराभव करत तिहेरी विजय संपादन करत दिमाखात उपांत्य फेरी गाठली. टीसीएस संघाने अॅमडॉक्स्‌ संघाचा 2-0(25-21, 25-19) असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. अॅमडॉक्स्‌ संघाने कॅपजेमिनी संघाचा 2-0(25-18, 25-16) असा दोन सेटमध्ये पराभव करत आगेकुच केली.

स्पर्धेचा सविस्तर निकालः साखळी फेरीः पुरूष गट

नेटसर्फ वि.वि सिनेक्रॉन 2-1(20-21, 25-21, 15-5)  सामनावीर- केतन सणस

अॅमडॉक्स्‌  वि.वि कॅपजेमिनी 2-1(17-25, 26-24, 15-6) सामनावीर- मोहन खोत

टीसीएस वि.वि  फोर्ब्स मार्शल 2-0(25-4, 25-7) सामनावीर- शैलेंद्र सिंग

इन्फोसिस वि.वि नेटसर्फ 2-0(25-13, 25-22) सामनावीर- नवेंदू उप्रेती

टेक महिंद्रा वि.वि टाटा टेक्नॉलॉजी  2-0(25-18, 25-14) सामनावीर- रोश फ्रांन्सिस

बाएनवाय मेलन वि.वि हमिंगबर्ड 2-0(25-17, 25-17) सामनावीर- कुणाल आगाशे

महिला गटः

इन्फोसिस वि.वि कॅपजेमिनी 2-0(25-15,25-11)सामनावीर-पल्

लभी बॅनर्जी

इन्फोसिस वि.वि टीसीएल 2-0(25-7, 25-5) सामनावीर- अॅग्नेल शापीनी

इन्फोसिस वि.वि टीसीएस 2-0(25-22, 25-22) सामनीवीर- प्रशंसा शर्मा

टीसीएस वि.वि अॅमडॉक्स्‌ 2-0(25-21, 25-19) सामनावीर- प्रिती सक्सेना

अॅमडॉक्स्‌ वि.वि कॅपजेमिनी 2-0(25-18, 25-16) सामनावीर- शितल खत्री

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.