सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

तळेगावात विवाहितेवर बलात्कार; एकाला अटक

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडेमध्ये एका 20 वर्षीय विवाहितेवर फ्लॅटची साफसफाई करण्याच्या बहाण्याने बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. ही घटना काल (रविवार) सकाळी तळेगाव दाभाडे येथील डाळआळी भागात घडली. पीडित महिला ही मोलमजुरीचे काम करते.

बिगाराम प्रभुजी देवासी (वय 45, सध्या रा. डाळआळी, तळेगाव दाभाडे, मूळ रा. बिजवाडी, राजस्थान), असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याला वडगाव मावळ न्यायालयापुढे आज सोमवारी हजर केले असता न्यायालयाने तीन मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.एम.लांडगे करीत आहेत.

spot_img
Latest news
Related news