वैकुंठ स्मशान भूमी येथील इंद्रायणी नदीपात्रात सापडले अनोळखी महिलेचे प्रेत

एमपीसी न्यूज – देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वैकुंठ स्मशान भूमी येथे इंद्रायणी नदीपात्रात आज (दि. 27) सायंकाळी साडेपाच वाजता एका महिलेचे प्रेत सापडले आहे. या महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेचे वय अंदाजे  40  ते 45 वर्ष  इतके आहे. रंग गोरा, अंगाने मजबूत असून लाल रंगाची साडी, ब्लाऊज, परकर गळ्यात मंगळसूत्र आहे, असे या महिलेचे वर्णन असून सदर महिलेचा स्कार्फने गळा आवळून खून केला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

वरील वर्णनाप्रमाणे सदर महिलेबाबत कोणतीही माहिती किंवा कोणत्याही पोलीस ठाण्यात हरवल्या बाबतची तक्रार असल्यास देहूरोड पोलीस ठाणे येथे दूरध्वनी क्रमांक 020 27671288 वर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पोलीस निरीक्षक अरुण मोरे अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.