देशभरातील बँका विविध मागण्यांसाठी आज बंद, नागरिकांचे हाल

एमपीसी न्यूज – देशभरातील बँका आज विविध मागण्यांसाठी संपावर आहेत. सरकारच्या बँक सुधारणा धोरणाविरोधात आणि नोटाबंदीच्या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या अतिरिक्त कामाचा मोबदला मिळावा, यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे.


बँकांच्या आजच्या संपामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल, बँक ऑफ बडोदासह इतर बँका सहभागी होणार आहेत. तर दुसरीकडे युनियन नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स आणि नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स यांनी या संपामध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. बँकांच्या या संपामुळे सामन्य नागरिकांचे हाल होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.