डॉ. वैशाली पाद्री यांची कोळी महासंघाच्या अध्यक्षपदी निवड

एमपीसी न्यूज – कोळी महासंघाच्या लोणावळा शहर अध्यक्षपदी लोणावळ्यातील डॉ. वैशाली चिंतामणी पाद्री यांनी नुकतीच निवड जाहीर करण्यात आली.

 
कोळी महासंघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रमेशदादा पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी कोळी महासंघाचे युवाध्यक्ष अॅड. चेतन पाटील, पुणे जिल्हा महिला सचिव माधुरी सोनवणे, चिंतामणी पाद्री, सतिष धडे आदी उपस्थित होते. कोळी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी व समाजाच्या न्याय मागण्या व हक्कांसाठी सदैव कार्य करण्याच्या मानस यावेळी डॉ. वैशाली यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.