शुक्रवार, सप्टेंबर 30, 2022

पराभूत उमेदवारांकडून बालगंधर्व चौक ते संभाजी बागेदरम्यान मतदान यंत्राची अंत्ययात्रा

येत्या रविवारी पुन्हा मोर्चा

एमपीसी न्यूज – पुण्यात महापालिकेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनी बालगंधर्व चौक ते संभाजी बागेदरम्यान मतदान यंत्राची अंत्ययात्रा काढण्यात आली. या निवडणुकीत मतदान यंत्रात सेटिंग करण्यात आल्याने आमचा पराभव झाला असून यातून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार केला आहे. बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यात याव्या, अशी मागणी यावेळी सर्व उमेदवारांनी केली. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच रविवारी पुण्यात मोर्चा काढण्यात येणार असल्याचे पराभूत उमेदवार दत्ता बहिरट यांनी जाहीर केले.

 

यंदाच्या पुणे महापालिकेत पराभूत उमेदवारांनी बालगंधर्व चौक ते वैकुंठ स्मशान भूमी दरम्यान मतदान यंत्राची अंत्ययात्रा आयोजित केली होती. या मोर्चाला साडेअकरा वाजता सुरुवात करण्यात आली. मात्र, त्यापूर्वीच मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मोर्चेकरांनी संभाजी बागेत मोर्चाचा समारोप केला. तसेच त्यापूर्वी त्यांनी रस्त्यावर हे यंत्र जाळून निषेध व्यक्त केला. यानंतर बागेत अनेकांची भाषणे देखील झाली. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृह नेते बंडू केमसे, नगरसेवक दत्तात्रय बहिरट, रुपाली पाटील तसेच शहरातील विविध भागातील पराभूत उमेदवार उपस्थित होते.

 

यावेळी दत्ता बहिरट म्हणाले की, महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने यंत्रात सेटिंग केली. त्यामुळे आम्हाला या निवडणुकीला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या सर्व बाबींचा विचार करीत सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असून प्रशासनाने देखील भाजपच्या दबावाखाली कामे केले. ही बाब निषेधार्थ असून लोकशाहीला घातक ठरणारी निवडणूक झाली आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर टीका केली.

 

संजय काकडेच्या ऑफिस परिसरात पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ

बालगंधर्व चौकातील मोर्चेक-यांनी राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी दिल्याने भाजप कार्यलायाच्या बाजूला असलेल्या काकडे यांच्या ऑफिसच्या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.

"andolan"
"andolan2"
"andolan

spot_img
Latest news
Related news