तळेगावमध्ये जागतिक मानवाधिकार समितीतर्फे पोलीस प्रशासन व नागरिकांच्या संयुक्तिक मेळाव्याचे निवेदन

एमपीसी न्यूज – जागतिक मानवाधिकार जनजागरण समितीतर्फे पोलीस प्रशासन व नागरिकांच्या संयुक्तिक मेळाव्याचे आयोजन करण्याबाबतचे निवेदन समितीच्या पुणे शहर जिल्हा सरचिटणीस प्रदीप नाईक यांनी तळेगाव पोलीस ठाण्यातील पोलीस निरीशक मुकुट पाटील यांना दिले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस, भाजप युवा मोर्चाचे मावळचे बाळासाहेब घोटकुले आदी उपस्थित होते. प्रदीप नाईक यांनी निवेदनामध्ये म्हणले आहे की, तळेगाव दाभाडे शहर अतिसंवेदनशील शहर असून परिसरातील गुन्हे त्याला अनुसरुन वाढलेला लोकसंख्या लक्षात घेता सजग नागरिक आणि पोलीस प्रशासनाने एकत्रित येऊन माहिती संकलन करावी. यामुळे वाढत्या नागरिकीकरणातून प्रशासनावर येणारा ताण व अफवांना विरोध होऊ शकेल. तसेच जनजागृती व माहिती या उद्दिष्टांसाठी अंतर्गत शहरात राहणारे, परगावचे नागरिक, व्यावसायिक, कामगार याची मेळाव्यात माहिती संकलित होण्यास मदत होऊन पोलिसांनाही गुन्ह्यातील तपासात उपयोगी ठरेल. असेही त्यांनी निवेदनात म्हणले आहे.