…अन चक्क एटीएम मशिनचा दरवाजा राहिला खुला

नागरिकांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ

एमपीसी न्यूज –  सकाळचे दहा वाजले  होते… रस्त्यावर रहदारीही होती. नेहमीप्रमाणे एक नागरिक एटीम मशिनमध्ये पैसे काढण्यासाठी गेला असता त्याला चक्क एटीएममशिनच पूर्ण खुले असल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला व मोठा अनर्थ टळला.

ही घटना आहे देहूरोड येथे आज (मंगळवारी) घडली. शिवा कोळी हे सकाळी नेहमीप्रमाणे स्टेट बँक ऑफ इंडिया एटीएमध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. मात्र, आत जाताच त्यांच्या लक्षात आले की एटीएम मशिनचा दरवाजा खुला आहे. त्यांनी देहूरोड पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहितीच मिळताच देहूरोड पोलीस घटनास्थळी पोहोचले. तेथे जाऊन त्यांनी पाहणी केली व संबंधित घटनेबाबत बँक कर्मचाऱ्यांना याची माहिती देण्यात आली.

परंतु बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून मात्र याबाबत अजब उत्तर मिळाले की, एटीएम तेथून शिफ्ट करावयाचे आहे. त्यामुळे ते लवकरच हलविण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. मात्र, या घटनेमुळे एटीएम मशिन बँक कर्मचा-यांच्या काम व जबाबदारीबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. एटीएममधून चोरी करण्याच्या घटना समोर येत आहेत. तर दुसरीकडे आज एटीएममध्ये लाखो रुपये ठेऊन एटीएम मशिनचे दार उघडे ठेवून चोरांनाच जणू आमंत्रण देताना खुद्द बँक कर्मचारी दिले आहे. आता या हलगर्जीपणाला बँक काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.