निवडणुकीच्या काळात विरोधात काम केल्याने एकाला जिवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – निवडणुकीच्या काळात विरोधी उमेदवाराचे काम  केल्याच्या रागातून एकाला चाकुचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना काल (27 फेब्रुवारी) दुपारी तीन वाजता शिवाजीनगर न्यायालयाच्या बाहेर घडली. याप्रकरणी 5 जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

समीर बाबुराव चांदेरे, किरण बाबुराव चांदेरे, गणेश बाजीराव इंगवले, मारुती दत्तोबा चांदेरे आणि निखील नंदकुमार धनकुडे (सर्व, रा. विरभद्रनगर, बाणेर, पुणे) यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. किरण मुरकुटे (वय-27, रा. बाणेर गाव, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, बाबुराव चांदेरे हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. निवडणुकीच्या काळात त्यांच्या विरोधात काम केल्याच्या रागातूनवरील आरोपींनी फिर्यादी कारमधून जात असताना त्यांची कार अडवत त्यांना धमकी दिली.

याप्रकरणी पोलीस उप निरीक्षक डी.एस.शिंदे अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.