शुक्रवार, सप्टेंबर 30, 2022

पिंपरीत विज्ञानदिन विविध कार्यक्रमांनी साजरा

एमपीसी न्यूज – शहरात विविध संस्था व सामाजिक संघटनांच्या वतीने विविध कार्यक्रम, प्रात्यक्षिकांद्वारे साजरा केला. रहाटणीतील पी. के. इंटरनॅशनल स्कूलद्वारे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन आयोजन करण्यात आले होते.

या प्रदर्शनात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी नवनवीन प्रकारचे  विज्ञान प्रयोग सादर केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे यांनी केले. यावेळी मुख्याध्यापिका दिपाली जुगूळकर, वृंदा भावे, तसेच सर्व पालकलर्ग, शिक्षकवृंद, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी  पालकांना थोडक्यात पण प्रयोगाला साजेशी, अशी माहिती सांगितली. यामध्ये सोलर सिस्टिम, रुम हिटर, एअर कंडीशनर, मिनी वॉटर पंप, एटीएम मशिन, विंड मिल. पाणी वाचवा पाणी जिरवा, शेतीचे महत्व, विजेचे महत्व सांगणारे विविध प्रयोग सादर केले.

चिंचवड येथील सायन्स पार्कमध्ये पुणे जिल्ह्यातील शाळा, पिंपरीतील शाळा, असे मिळून 200 शाळांनी चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. याचे पारितोषिक वितरण पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी प्रवीण लडकत, प्रवीण तुपे आदींच्या हस्ते करण्यात आले. दिव्यांग विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. भावसार व्हीजनच्या वतीने या विद्यार्थ्यांना जेवणाची सोय करण्यात आली होती.  दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बरोबर इतर शाळेतील विद्यार्थी ही सहभागी झाले होते.
"day
"day
"day
"day

spot_img
Latest news
Related news