आळंदीत विविध विकास कामांची नगराध्यक्षांकडून पाहणी

सर्व पक्षीय पदाधिका-यांची उपस्थिती

एमपीसी न्यूज – आळंदी नगरपरिषद नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर (कांबळे) यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या समवेत तीर्थक्षेत्र आळंदी विकास आराखड्यातील विविध विकास कामांची पाहणी करून माहिती घेतली.

यावेळी उपाध्यक्ष प्रशांत कु-हाडे, मुख्याधिकारी संतोष टेंगले, नगरसेवक, सचिन गिलबिले, प्रकाश कु-हाडे, गटनेते पांडुरंग वहिले, आदित्य घुंडरे, बालाजी कांबळे, दिनेश घुले, तुषार घुंडरे, नगरसेविका प्रतिभा गोगावले, प्राजक्ता घुंडरे, स्नेहल कु-हाडे, माजी नगराध्यक्ष सचिन पाचुंदे, सामाजिक कार्यकर्ते संदेश तापकीर, अविनाश तापकीर आदींसह पालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्षा उमरगेकर यांनी पालिकेचे अधिकारी आणि नवनिर्वाचित नगरसेवक पदाधिकारी यांनी पाणी पुरवठा केंद्रातील जलशुद्धीकरण प्रकल्पाचे कामासह तीर्थक्षेत्र आळंदी विकास आराखड्यातील सिद्धबेट विकास प्रकल्पाच्या कामाची पाहणी करून माहिती घेतली.

कोट्यावधी रुपये विकास निधी खर्च करून होत असलेल्या कामाची प्रगती आणि गुणवत्ता नसल्याची बाब या पाहणीत उघड झाली आहे. काम प्रचंड विलंब आणि संथ गतीने होत आहे. तसेच यात चिरा गेल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी काम उखडलेले पाहण्यास मिळाले. जॉगिंग ट्रॅक चे काम ही याच प्रकारचे खराब झाले आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील दोन्ही कामातील त्रुटी आणि गुणवत्ता याबाबत पुणे जिल्हाधिकारी यांच्या समवेत सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांची स्वतंत्र बैठक घेत आळंदीतील विकास कामे दर्जेदार होण्यासह तात्काळ पूर्ण करण्यासाठी चर्चा करून सुसंवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आळंदीतील नागरिक आणि भाविक यांना पिण्याचे पाणी प्राधान्याने देण्यासाठी येथील पाणी पुरवठ्याच्या कामांना गती देणार असल्याचे नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी सांगितले. येथील इंद्रायणी नदी प्रदूषण आणि जलपर्णी  मुक्त करण्यासह विविध विकास कामात नागरिक आणि सर्व पक्षीय पदाधिकारी आणि प्रशासन यांचा सुसंवाद रुपी त्रिवेणी संगम साधून विकासाला गती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तीर्थक्षेत्र आळंदीतील इंद्रायणी नदी प्रदूषण आणि जलपर्णी मुक्त करण्यासाठी नवनिर्वाचित पदाधिकारी आणि अधिकारी यांनी पाहणी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.