नीलम गोऱ्हे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज – शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेज करून बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी देणा-यास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकने जळगाव येथून अटक केली.

 

दिपककुमार प्यारेलाल (वय -40) असे त्याचे नाव आहे. दिपककुमार हा आरटीआय कार्यकर्ता आहे. त्याने नीलम गोऱ्हे यांच्यासह  राज्यातील 10 ते 12 जणांना अशाप्रकारचे मेसेज पाठवल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे

डॉ. नीलम गो-हे यांना 21 फेब्रुवारीला ‘बलात्कार करून ठार मारू’ अशी धमकी मोबाईलवर टेक्स्ट मेसेज करून देण्यात आली. त्यांनी त्वरीत याची पोलिसांकडे तक्रार केली होती. परंतू, त्यानंतर काहीच कारवाई झाली नाही. 27 फेब्रुवारीला नीलम गो-हे यांच्या दुस-या मोबाईल क्रमांकावर पुन्हा अशाच प्रकारचा मेसेज आला. याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्यानंतर याची दखल घेत त्यांनी प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश मुंबई व पुणे पोलिसांना दिले. त्यानुसार नीलम गो-हे यांनी मंगळवारी मुंबईचे सह पोलीस आयुक्त देवेन भारती व पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे तक्रार केली आहे.

सहायक आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक नितीन भोसले पाटील, उपनिरीक्षक दिनेश पाटील यांनी ही कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.