विनोदी लेखक तारक मेहता यांचे निधन

एमपीसी न्यूज – विनोदी लेखक तारक मेहता यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. मेहता यांना 2015 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांचा जन्म 26 डिसेंबर 1926 रोजी गुजरात मधील अहमदाबाद येथे झाला होता. मेहता यांचे देहदान करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. 

 
सब टीव्हीवरील प्रसिद्ध तारक मेहता का उल्टा चश्मा या हिंदी मालिकेची कथा तारक मेहता यांच्या "दुनिया ने ऊन्धा चश्मा" वर आधारित असून 28 जुलाई 2008 पासून याचे प्रेक्षेपण करण्यात येते. ही सर्वात लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका आहे. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.