भोसरीत चित्रपट गीतांनी रंगले मैथीली भाषकांचे ‘होली मिलन’

एमपीसी न्यूज –  ‘मैथीली चित्रपट गीत’, ‘भजन’ आणि  गमतीदार किस्से अशा विविध कार्यक्रमांनी पिंपरी-चिंचवड शहरातील मैथीली भाषिकांचा होली मिलन आणि मैथीली सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. 
 

भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमला खासदार अमर साबळे, नगरसेवक रवी लांडगे, लक्ष्मण सस्ते, मिथीला विकास मंचचे अध्यक्ष मिहिर झा, प्रख्यात मैथीली कलाकार विकास झा,  सुरेश आनंद आणि  जुली झा आदी उपस्थित होते. 

बिहार राज्यात मिथीला प्रांत आहे. या प्रांताची मैथीली बोलीभाषा आहे. मिथीला येथील मैथीली भाषक रोजगार आणि उद्योगधंद्यानिमित्त पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. या सर्व ‍मैथीली भाषकांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मिथीला विकास मंचच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे हे दुसरे वर्ष होते. मैथीली भाषकांना संकटकाळात मंचच्या वतीने मदत करण्यात येते. त्यानुसार या कार्यक्रमावेळी गरजू असलेले अनिल झा यांना 21 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.  

यावेळी खासदार अमर साबळे म्हणाले, मैथीली ही सीतामातेची भाषा आहे. त्यामुळे या भाषेत मायेचा ओलावा आहे. केवळ बिहारमधील एका प्रांतासाठी ही भाषा मर्यादित नसून, संपूर्ण देशाला ही भाषा परिचित आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह परिसरात वास्तव्यास असलेल्या मैथीली भाषकांना पूर्ण मदत करण्यास आपण तयार आहोत. त्यांच्या समस्या आणि प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेऊ, अशी ग्वाही खासदार साबळे यांनी या वेळी दिली. 

मैथीली कलाकार विकास झा, सुरेश आनंद आणि जुली झा यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढविली. या कलाकारांनी सादर केलेले मैथीली चित्रपट गीत आणि भजन यामुळे कार्यक्रम रंगतदार झाला. चुटकुले आणि अनेक किस्से सांगून निवेदक राधे यांनी उपस्थितांना खिळवून ठेवले.
मिथीला विकास मंचचे पुणे येथील कार्याध्यक्ष राकेश मिश्रा, महासचिव सुबोध झा, अनिल झा उपाध्यक्ष रामकुमार झा, ललित ठाकूर, बालकृष्ण मिश्रा, घनःश्याम झा, कोषाध्यक्ष बिभाष चंद्रा, सहकोषाध्यक्ष दीपक झा, सचिव मनोज झा, सरोज झा, वरिष्ठ सदस्य डॉ. मनमोहन झा, सके रॉय, शंकर झा, डॉ. डी. के. झा, अशोक दास, मिहिर झा, हर्षवर्धन मिश्रा आणि सदस्य सुनील झा, रविंद्र झा, अजित चौधरी, उदित दास आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.