पुणे महापालिकेच्या पराभवाला इम्तियाज जलील जबाबदार – जुबेर बाबू शेख

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एमआयएम पक्षाला चांगले वातावरण होते. परंतु आमदार इम्तियाज जलील यांनी उमेदवारांकडून 10 लाख रुपयांची मागणी केल्याने शहरातील वातावरण दूषित झाले. याचा फटका पक्षाला बसला. त्यांच्या अशा भूमिकेमुळे पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे त्यांनी पराभवाची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी शहर अध्यक्ष जुबेर बाबू शेख यांनी केली. या सर्वाची तक्रार पक्ष श्रेष्ठींकडे करण्यात येणार आहे.
 
 
या विषयी शेख म्हणाले की, आमदार जलील यांना निवडणुकीपूर्वी अनेक वेळा फोन केला. मात्र, त्याला एकदा ही त्यांनी उत्तर दिले नाही. किंवा शहरातील परिस्थितीबाबत विचारले नाही. ते फक्त निवडणुकीच्या दरम्यान 5 दिवस अगोदर आले होते. या त्यांच्या कार्यपद्धतीचा पक्षाला फटका बसला आहे. त्यांनी पुण्याकडे लक्ष दिले असते. तर अनेक जागा निवडून आल्या असत्या. मात्र, त्यांनी तसे काही केले नाही.

 
 
असे सांगत ते पुढे म्हणाले की, शहरात ज्या दोन सभा झाल्या त्याला संपूर्ण माझा खर्च झाला आहे. त्यावेळी त्यांनी मदत करणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी तसे काही केले नाही. या निवडणुकीत माझ्यासह अनेकांना त्यांनी अन्याय केल्याचा त्यांनी आरोप केला. त्याचबरोबर शहरात येरवडयातील जागा वैयक्तिक काम केल्याने आली आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील मदत केल्याने निवडून आली आहे. या निवडणुकीबाबत लवकरच पक्ष श्रेष्ठींसमोर व्यथा मांडणार असल्याचे त्यानी सांगितले.

 
याबाबत आमदार इम्तियाज जलील यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता त्यांनी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी या आरोपावर भूमिका जाहीर करतील, असे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.