एचडीएफसी, आयसीआयसीआय बँकेतून पैसे काढण्यावर येणार मर्यादा!

पाचव्या व पुढील व्यवहारांसाठी द्यावे लागणार प्रत्येकी 150 रुपये

एमपीसी न्यूज – एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि अॅक्सिस या तिन्ही बँकांनी एक मार्चपासून महिन्यातील पहिले चारच व्यवहार मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर पाचव्या व्यवहारावर तब्बल 150  रुपये संबंधित ग्राहकाकडून आकारले जाणार आहेत. या निर्णयामुळे सर्वसामान्य माणूस नाहक होरपळला जाणार आहे.

एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि अॅक्सिस या तिन्ही बँकांनी एक मार्चपासून महिन्यातील पहिले चारच व्यवहार मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर पाचव्या व्यवहारावर तब्बल 150 रुपये संबंधित ग्राहकाकडून आकारले जाणार आहेत. म्हणजे मार्च महिन्यात कोणत्याही ग्राहकाने बँकेमध्ये जाऊन किंवा एटीएममध्ये जाऊन पैसे काढले किंवा भरले तर पहिले चारच व्यवहार त्याला विनाशुल्क करता येतील. त्यानंतर जर कोणी ग्राहक पुन्हा बँकेत गेला तर त्याला पुढील प्रत्येक व्यवहारासाठी स्वतःच्या खात्यातून 150 रुपये प्रत्येक वेळी बँकेला द्यावे लागतील.

यापूर्वी महानगरांमधील ग्राहकांसाठी एटीएममध्ये प्रतिमहिना पाच व्यवहार मोफत होते. पण त्यानंतर पुढील व्यवहारांसाठी 50 रुपये शुल्क आकारले जायचे. पण आता सरसकट सर्वच ग्राहकांसाठी तिप्पट म्हणजे 150 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

बँकांमध्ये ठेवलेले आपलेच पैसे काढण्यासाठी खासगी क्षेत्रातील एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि अॅक्सिस या बँकांनी भरमसाठ शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्यामुळे ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.