निगडीत पत्नीचा गळा आवळून खून

एमपीसी न्यूज – कौटुंबिक वादातून सुरक्षारक्षकाने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केला. ही घटना आज (गुरुवारी) दुपारी बाराच्या सुमारास स्पाईन रोड, चिखली येथे उघडकीस आली.

 

कमला रामू विश्वकर्मा (वय 22, रा. चिखली) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती रामू विश्वकर्मा (वय 23) याला निगडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, विश्वकर्मा कुटुंबिय मुळचे नेपाळचे रहिवाशी आहेत. रामू हा चिखली येथील धीरज अपार्टमेंटमध्ये सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करत आहे. सोसायटीच्या बाजूलाच ते राहत होते. गुरुवारी सकाळी पती-पत्नींची भांडणे झाली होती. चिडलेल्या रामूने गळा आवळून पत्नी कमलाचा खून केल्याचे, पोलिसांनी सांगितले. त्यांना दोन मुले आहेत.

 

पत्नीचा खून करुन रामू पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला पकडले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरीतील महापालिकेच्या (वायसीएम) रुग्णालयात नेण्यात आले आहे.

 

निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.