शनिवार, डिसेंबर 3, 2022

प्रशांत वहिले क्लबचा ग्लॅडिटर संघावर पाच गडी राखून दणदणीत विजय

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित सदू शिंदे साखळी लिगच्या क्रिकेट स्पर्धेत वडगाव येथील प्रशांत वहिले क्लबने पुण्यातील  ग्लॅडिटर संघावर पाच गडी राखून दणदणीत विजय मिळवला.

मावळ, पाचाणे येथील ख्रिसली मैदानावर हा क्रिकेटचा सामना झाला. वहिले क्लबचे कर्णधार शैलेश वहिले याने चार गडी बाद आणि प्रशांत जाचक यांनी तीन गडी बाद करीत निम्मा संघ माघारी धाडला. प्रसन्न वर्तक, शुगन कुमार यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

ग्लॅडिटर संघाचा क्रुपाल याने 66 धावा केल्या. सौरभ याने 44 धावा करत त्याला साथ दिली. संघाला 37.4 षटकात सर्व बाद 173 धाव केल्या. 173 धावांचा पाठलाग करताना वहिले क्लबच्या अमोल ठोंबरे याने 46 चेंडूत 54 धावा आणि वैभव मुंडे याने 38 धावा केल्या. तर, प्रफुल चौधरी, शुगन कुमार आणि प्रसन्न वर्तक यांनी संयमी खेळी करत वहिले क्लबला 27.5 षटकात विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक, ग्लॅडिटर संघ: 37.4 षटकात सर्व बाद 173 (क्रुपाल- 66, सौरभ-44, शैलेश वहिले – 4/56, प्रशांत जाचक – 3/39, प्रसन्न वर्तक – 1/31, शुगन कुमार – 1/7) पराभूत वि वहिले क्लब : 27.5 षटकात 5 गडी 177 (अमोल ठोंबरे – 54, वैभव मुंडे – 38, प्रफुल चौधरी- 37, शुगन कुमार – 20,  प्रसन्न वर्तक – 15, क्रुपाल – 2/40, हिमेश – 1/14)

Latest news
Related news