शनिवार, डिसेंबर 3, 2022

विश्वानंद केंद्रातर्फे आयुर्वेदिक डॉक्टरांसाठी रविवारी वैद्यकीय परिषद

एमपीसी न्यूज – विश्वानंद केंद्र व मलबार हेरिटेज फार्मसी (बंगळुरू) यांच्या संयुक्त विद्यमाने आयुर्वेदिक डॉक्टरांसाठी वैद्यकीय परिषद होणार आहे. आयुर्वेदिक वैद्यांसाठी शास्त्रोक्त औषधीचा वापर व त्याचा रुग्ण चिकीत्सेतील उपयोग या विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी आयुर्वेदिक तज्ज्ञ वैद्य गोपा कुमार (त्रिवेंद्रम, केरळ) हे मार्गदर्शन करणार आहेत. रविवारी (दि. 5) सकाळी 9.00 वाजता सहकारनगर येथील राजीव गांधी ई लर्निंग सेंटर येथे परिषद होणार आहे.

परिषदेचे आयोजन विश्वानंद केंद्राचे विश्वस्त राजकुमार चोरडिया, डॉ. अजित मंडलेचा, डॉ. गिरीष सरडे, डॉ. तनुजा आंबळे, मलबार हेरिटेज फार्मसीचे विजय कुमार यांनी केले आहे. वैद्यकीय परिषदेचे उद्घाटन  डॉ. सतिश डुंबरे यांच्या हस्ते होणार असून यावेळी आयुर्वेदिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

डॉ. अजित मंडलेचा म्हणाले, भारताला आयुर्वेद शास्त्राची जुनी परंपरा लाभली आहे. प्राचीन काळापासून वैद्यकीय क्षेत्रात आयुर्वेदात मोलाचे स्थान असल्याचे दिसते. परिषदेदरम्यान आयुर्वेदिक औषधींचा रुग्णांवर शास्त्रोक्त पद्धतीने कसा वापर करावा या विषयी आयुर्वेदिक तज्ज्ञ वैद्य गोपा कुमार मार्गदर्शन करणार आहेत.

Latest news
Related news