स्मार्ट पिंपरी-चिंचवडसाठी स्मार्ट लोगो देण्याची नागरिकांना संधी

सर्वोत्कृष्ठ लोगोसाठी  केंद्र सरकार घेणार स्पर्धा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडची उशिरा का होईना स्मार्ट सिटी प्रकल्पात  निवड झाली आहे. आपल्या शहराला जगासमोर कसे सादर कराल किंवा स्मार्ट पिंपरी-चिंचवड कसे असावे यावर आधारीत पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचा लोगो तयार करण्यात येणार आहे. याचे वैशिष्ट्य, असे की पिंपरी-चिंचवडकरांना त्यांच्या शहराचा लोगो बनवता येणार आहे. त्यासाठी केंद्र सराकारने स्पर्धेचे आयोजन देखील केले आहे.

 

केंद्र सरकार व महापालिका प्रशासन यांच्या वतीने स्मार्ट पिंपरी-चिंचवडचा कार्यवाही अहवाल बनविण्यात येत आहे. या कार्यवाही अहवालासाठी नागरिकांच्या प्रतिक्रिया, सूचना यांचा जास्ती-जास्त वापर व्हावा यासाठी नागरिकांचा सहभाग वाढविण्यात येत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचा लोगोही नागरिकांनीच बनवलेला असावा, असे नमूद करण्यात आले आहे.

केंद्र सरकारतर्फे लोगोसाठी स्पर्धाही घेण्यात येणार आहे. मिळालेल्या लोगोची परिक्षकांकडून पाहणी केली जाईल, त्यातून तीन लोगो निवडले जातील. त्यातील प्रथम क्रमांकाला 25 हजाराचे बक्षीस, द्वितीय क्रमांकाला 15 हजाराचे बक्षीस तर तिस-या क्रमांकासाठी 1 हजाराचे बक्षीस मिळणार आहे. त्यातील प्रथम क्रमांकाचा लोगो हा पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचा लोगो मानला जाणार आहे. या लोगोचे परीक्षण लोगोच्या डिझाईनमध्ये वापरलेले नावीन्यपूर्ण कल्पना व त्यांचा वस्तूस्थितीशी लावलेला संबंध यावरून मुल्यांकन केले जाणार आहे.

काय असतील स्पर्धेचे नियम ?

# इच्छुकांना https://www.mygov.in/ या संकेत स्थळावर त्यांचे स्पर्धेचे प्रवेशपत्र भरता येणार आहे. या संकेतस्थळावर आलेल्या प्रवेशिकाच ग्राह्य धरल्या जातील.

# लोगो बरोबर त्या लोगोचे स्पष्टीकरण देणेही बंधनकाराक आहे. ( हे स्पष्टीकरण जास्तीतजास्त 100 शब्दांचे असावे)

# लोगोचा अकार हा कमीत-कमी 4 इंच X 4 इंच असावा.

# 15 मार्चपर्यंत लोगो स्पर्धेसाठी देता येणार आहेत.

# लोगो बनवत असताना इतरांच्या साहित्याचा म्हणजेच कोणतेही फोटो, चिन्ह, इतर छायाचित्र आदींचा वापर करता येणार नाही. ती नकल समजण्यात येईल.

# लोगो हा कमीतकमी 300 डीपीआयचा असावा

# लोगो हा jpg किंवा pdf स्वरुपात दाखल करावा

वरील अटी-शर्तीचे पालन करून नागरिकांना स्मार्ट पिंपरी-चिंचवडसाठी लोगो तयार करून पाठवता येणार आहे. त्यातूनच एका लोगोची स्मार्ट पिंपरी-चिंचवडचा लोगो म्हणून निवड करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.