निगडीत फटाक्याच्या भडक्यात मुलगा जखमी

एमपीसी न्यूज : – रस्त्यालगत पडलेले फटाके जमवून खेळत असताना भडका उडाल्याने 10 वर्षाचा मुलगा जखमी झाला. ही घटना गुरुवारी (दि.२) दुपारी निगडीतील ओटास्कीम परिसरात ही घटना घडली.
 
हर्षद अरिफ खान (वय १0, रा. निगडी ओटास्किम) असे जखमी मुलाचे नाव आहे. त्याच्यावर पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
हर्षद हा निगडीतील एका खासगी शाळेत दुसरीत शिकतो. गुरुवारी दुपारी खेळत असताना हर्षदला काही फटाके सापडले. त्याने फटाके उघडून त्यातील दारू एका कागदावर जमा केली. त्यानंतर तो कागद पेटवला असता आगीचा भडका उडाला होता. त्यामध्ये त्याच्या हाताला, पायाला भाजले असून झळा बसल्याने चेहरा काळवंडला आहे. 
Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share