कलापिनी बाल-भवन हर्णेश्वर-चाकण रोड शाखा सुरु

एमपीसी न्यूज – कलापिनी "बालभवन"ची हर्णेश्वर-चाकण रोड शाखा 1 मार्चपासून सुरु अतिशय उत्साहात सुरु करण्यात आली. "दोन दोन उंदीर विणायला बसले ….. " या अतिशय मजेशीर बालगीताने डॉ. अनंत परांजपे यांनी मुलांचे हसू फुलवले आणि शाखेचे उद्‌घाटन पार पडले.

यावेळी कलापिनीच्या उपाध्यक्षा शर्मिला शहा, बालभवन प्रमुख अंजली सहस्रबुद्धे, अनघा बुरसे आदी उपस्थित होते. प्रशिक्षिका म्हणून ज्योती ढमाले, धनश्री वैद्य, श्वेता नामजोशी, आणि ज्योती देशपांडे काम पाहणार आहेत.

लिटिल बर्डीज प्री-स्कुल व डे केअरच्या संचालिका पर्णवी वाडदेकर आणि डिस्कव्हरिंग करिअर्सचे संचालक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. आनंद वाडदेकर यांच्या पुढाकाराने कलापिनी "बालभवन" हर्णेश्वर-चाकण रोड शाखा सुरु करण्यात आली आहे. नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी विद्यालयासमोर, साई बाबा मंदिरामागे ही शाखा असेल. सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 5 ते 6.30 या कालावधीत ही शाखा सुरु राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.