सांगवी पोलीस ठाण्यासमोर तृतीयपंथ्यांमध्ये मारामारी

एमपीसी न्यूज – नागरिकांना पैसे मागणा-या खोट्या तृतीयपंथ्याला ख-या तृतीयपंथ्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना आज (शुक्रवारी) दुपारी एकच्या सुमारास घडली.

सांगवी पोलीस ठाण्यासमोर शुक्रवारी दुपारी एक खोटा तृतीयपंथी पैसे मागत होता. त्यावेळी तिथे आलेल्या ख-या तृतीय पथ्यांमध्ये आणि त्याच्यात पैसे मागण्यावरून वादावादी झाली. वादावादीचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर तिथे 20 ते 25 खरे तृतीयपंथी आले आणि त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाल्याचे, प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले.

पोलीस ठाण्यासमोरच मारामारी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.