शनिवार, डिसेंबर 3, 2022

सरकारमध्ये सत्तेसाठी नव्हे, तर सत्यासाठी – सुधीर मुनगंटीवार

एमपीसी न्यूज – पारदर्शकतेच्या मुद्द्यावर आमची आणि शिवसेनेची एकच भूमिका असून घटनेच्या चौकटीत पारदर्शकतेच्या मुद्द्यावर ज्या तरतुदी आहेत. त्या मान्य करण्याची आमची तयारी आहे. त्याच बरोबर जनतेने ही पारदर्शकतेच्या सूचना पाठव्यात. त्याचा समावेश केला जाईल. तसेच मुंबई महापालिकेच्या महापौरपदावर चर्चा ही होत राहील. पण आम्ही सरकारमध्ये सत्तेसाठी किंवा पदासाठी नाही. तर सत्यासाठी आहोत, अशी भूमिका राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार  यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे हे पत्रकार परिषदेला उपस्थित होते. पुणे विभागीय आढावा बैठकीसाठी ते आले होते.

यावेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, शिवसेनेच्या मंत्र्याच्या पारदर्शकतेच्या सूचना मान्य असून आमची लढाई ही महापौरपदाच्या खुर्चीसाठी कधीही नव्हती. फक्त पारदर्शकतेसाठी होती. 

ते पुढे म्हणाले की, यंदा कृषी क्षेत्राबरोबरच रोजगार आणि कौशल्य विकासावर राज्य सरकार लक्ष केंद्रित करणार आहोत. तसेच रोजगारा संदर्भात जिल्हा स्तरावर काम व्हावे. त्यादृष्टीने कौशल्य विकास केंद्र स्थापन व्हावीत त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी दिला जाईल, असेही ते म्हणाले.

Latest news
Related news