महाविद्यालयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

 

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे दाभाडे जवळील कातवी या गावात एका महाविद्यालयीन युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी संध्याकाळी उघडकीस आला.

मोनाली बंडू कांबळे(वय 17,रा.कातवी,ता.मावळ) असे आत्महत्या केलेल्या महाविद्यालयीन युवतीचे नाव आगे. राहत्या घरातील छताच्या लोखंडी अॅगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन तिने आत्महत्या केली.

आत्महत्येचा हा  प्रकार शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आला. मोनाली ही तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात वाणिज्य शाखेतील अकरावीच्या वर्गात शिकत होती.

आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.  शुक्रवारी  रात्री उशीरा कातवी येथे  पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुढील तपास  पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली  सहाय्यक फौजदार  एस.पी.पानसरे करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.