वाकड, भूमकर चौकात सांडपाणी रस्त्यावर; परिसरात दुर्गंधी

एमपीसी न्यूज – वाकड येथील भूमकर चौकात चेंबरमधून सांडपाणी बाहेर येत आहे. सांडपाणी रस्त्यावर साठून राहिल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. महापालिका प्रशासनाने चेंबरची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 

भूमकर चौक हा वर्दळीचा चौक आहे. या परिसरातून दिवसभर वाहणांची ये-जा सुरु असते.  रस्त्यावर साठलेल्या पाण्यामुळे वाहने संथ गतीने जात आहेत. या चौकात वाहतूक नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलीस दिवसभर तैनात असतात. वाहतूक पोलिसांना सांडपाण्याचा  नाहक त्रास सहन करावा लागत असून पाण्यात उभे राहून वाहतूक नियंत्रण करावे लागत आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून चेंबरमधून पाणी रस्त्यावर येत असून याबाबत पालिकेच्या संबंधिक विभागाला सांगितले आहे. मात्र, महापालिकेकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वाहनचालक आणि वाहतूक पोलिसांना याचा त्रास होत आहे. वाहतूक पोलिसांना दुर्गंधीयुक्त सांडपाण्यात उभे राहून वाहतूक नियंत्रण करावे लागत आहे, असे वाकड वाहतूक पोलीस शाखेचे कर्मचारी कलंदरे यांनी सांगितले. 

महापालिकने किंवा स्थानिक कार्यकर्त्यांनी ही समस्या लवकरात-लवकर दूर करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.