ससून रुग्णालयात एका रुग्णाची आत्महत्या

एमपीसी न्यूज – पुण्यातील ससून रुग्णालयात आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास वॉर्ड क्रमांक 25 मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाने स्टोअर रुममधील जाळीला बेडशीट बांधून आत्महत्या केल्याची घटना घडली.
योगेश कांबळे (वय 40, रा. मुंढवा) असे आत्महत्या केलेल्या रुग्णाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे हे वायरिंगचे काम करीत असताना शॉर्ट सर्किट झाल्याने ते 30 ते 35 टक्के भाजले गेले.त्यामुळे त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर मागील 5 दिवसापासून उपचार सुरु होते.
शनिवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास वार्ड क्रमांक 25 मधील स्टोअर रूममधील जाळीला बेडशीटचे तुकडे बांधून त्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तसेच अद्यापपर्यंत आत्महत्या करण्यामागचे कारण समजू शकले नाही.
बंडगार्डन पोलीस आधिक तपास करीत आहे.