कोथरूडमध्ये ड्रेनेज तुंबल्याने सोसायटीतील नागरिक त्रस्त; प्रशासन अजूनही दोष शोधण्यात व्यस्त

एमपीसी न्यूज – पुण्यात कोथरूडमधील 7-8 सोसायट्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून ड्रेनेजचे तुंबलेले पाणी तळघरात साचले आहे. मात्र, पुणे महापालिका अधिका-यांना अजूनही ड्रेनेजमध्ये नेमका कोठे दोष झाला आहे, हे सापडत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

 

पुण्यात कोथरूड भागातील निसर्ग सुंदर, ओंकारश्री, रूणवाल संकल्प, शिवतारा या सोसायट्यांच्या तळघरात गेल्या दोन दिवसांपासून ड्रेनेज तुंबल्याने पाणी साचले आहे. यामुळे नागरिकांना याच तुंबलेल्या पाण्यात वाहने लावावी लागत आहेत. तसेच यामुळे इथे वीजपूरवठाही खंडित झाला आहे. परिणामी डासांची उत्पत्ती होऊन नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. तसेच नागरिकांवर गॅलरीमधून शिडी लावून उतरण्याची पाळी आली आहे. सोसायटीतील लहान मुले व ज्येष्ठ यांना याचा सगळ्यात जास्त त्रास सहन करावा लागत आहे. या साचलेल्या पाण्यातून मोठ्या दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळेही लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

 

याबाबत महापालिका प्रशासनाला कळविण्यात आले आहे. दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र, अधिका-यांना ड्रेनेजमध्ये नेमका कोठे दोष आहे, हेच सापडत नसल्याने पाणी तसेच तुंबून राहत आहे. परिणामी नागरिकांची गेल्या दोन दिवसांपासून परवड होत आहे.

 

याबाबत महापालिका अधिका-यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.