पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी वेब पोर्टल व मोबाईल अॅपचे महापालिका आयुक्तांच्या हस्ते उद्‌घाटन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या स्मार्ट सिटी वेब पोर्टल व स्मार्ट सिटी अॅपचे महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या हस्ते आज (शनिवारी) उद्‌घाटन झाले.

 

यावेळी महापालिकेचे  अधिकारी, सल्लागार डीसीएफ अॅडवायजर संस्था व क्रिसल या संस्थेचे प्रतिनीधी उपस्थित होते. महापालिका आयुक्तांनी आज बटणदाबून www.smartcitypimprichinchwad.in या पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी  वेब पोर्टल व smart city PCMC या स्मार्ट सिटी मोबाईल अॅपचे उद्‌घाटन केले. हे अॅप आज पासून गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.

 

वेब पार्टल व मोबाईल अॅपद्वारे नागरिकांनास्मार्ट सिटीबद्दलची आपली मते व सुचना ऑनलाईन पद्धतीने नोंदवता येणार आहेत. यामध्ये ऑनलाई फॉर्मची सुविधा करण्यात आली आहे. जिथे नागरिक ऑनलाईन फार्म भरता येणार आहेत.यामध्ये अर्ज भरणा-या व्यक्तीची  वैयक्तीक माहितीही घेण्यात येणार आहे. नागरिकांनाच्या सुचना घेण्यासाठी फॉर्म ऑनलाईन पद्धतीने, प्रत्यक्ष भेटून, शाळा, विविध संस्था आदीच्या मदतीने सुटना घेतल्या जात आहेत. शहराच्या लोकसंखयेच्या 10 टक्के फॉर्म म्हणजे 2 लाख फॉर्म हे भरले जाणार आहेत. त्यावरुन शहराला सधारण काय अफेक्षीत आहे किंवा कोणत्या विकासाची गरज आहे याचा अहवाल तयार करण्यात येणार आहे.

 

या फार्म व सूचनांमधून लकी ड्रॉ काढला जाणार आहे. ज्यामध्ये पहिल्या क्रमांकाला 50 हजाराचे बक्षीस, दुस-या क्रमांकाला 30 हजार सुपये तर  तिस-या क्रमांकांस 20 हजार रुपयांचे पक्षीस दिले जाणार आहे.या सुचना नागरिकांना  15 मार्च पर्यंतच देता येणार आहेत. त्यामुळे आपल्या शहराला केवळ एका महिन्याच्या कालावधीत स्मार्ट सिटीसाठी प्रस्ताव बनवायचा आसल्यामुळे नागरिकांनी सहकार्य करत जास्तीत जास्त सभहभाग नोंदवून  स्मार्ट सिटी सर्वेक्षणात आपला अभिप्राय नोंदवावा असे आवाहन महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले आहे.

 

पिंपरी-चिंचवड शहराची तिस-या फेरीमध्ये निवड झालेली आहे. त्यामुळे अवघ्या महिनाभरात शहराला स्मार्ट सिटी अहवाल केंद्र सरकारपुढे सादर करावयाचा आहे. त्यामध्ये नागरिकांना केंद्र बिंदू मानून अहवाल तयार करायचा असल्याने मगापालिकेतर्फे  वेगवेघळ्या पातळ्यावर नागरिकांच्या प्रतिक्रीया, सुचना गोळा करण्याचे काम चालू आहे. यामध्ये स्मार्ट सिटी लोगो, स्मार्ट सिटी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, भिंतीवरील चित्रकलेच्या स्पर्धा, सोशल मीडीया अशा विविध स्पर्धा व चर्चा सत्र, आदींच्या माध्यमातून जनजागृती  करण्याचे व नागरिकांना आकर्षीत करण्याचे काम चालू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.