बुधवार, ऑक्टोबर 5, 2022

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा निषेध

एमपीसी न्यूज – सोलापूर येथील शासकीय पॉलिटेक्निकल महाविद्यालय बंद करण्याची धमकी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांना दिली असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या विद्यार्थी संघटनेने केला आहे. त्याच्या निषेधार्थ शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आज (शनिवारी) तावडे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

 

पिंपरीतील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहाराध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. कार्याध्यक्ष उमेश काटे, नारायण पाटील, अक्षय शेडगे,  विशाल घोडेस्वार, राम गोडांबे, निखिन नढे, ऒंकार थोपटे, कमलेश ढवळे, माऊली मोरे, बंटी मासाळ, विजय पोहणकर, रईस मोमीन, अक्षय बोराटे, अनिकेत पुसदकर, अतुल यादव यांच्यासह विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.

 

सोलापूर येथील शासकीय पॉलिटेक्निकल महाविद्यालय बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी महाविद्यालय बंद न करण्याची विनंती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे मोबाईल फोनवरून संदेश पाठवून केली होती. तावडे यांनी विद्यार्थ्यांच्या विनंतीकडे लक्ष न देता विद्यार्थ्यांना फोन करून कॉलेज बंद पाडण्याची धमकी दिली, असल्याचे आंदोलक यावेळी म्हणाले.

 

सैनिकांच्या पत्नीबद्दल वादग्रस्त विधान करणा-या भाजप पुरुस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांचा जाहीर निषेध करण्यात आला. ‘फडणवीस सरकारने परिचारक यांच्यावर ‘देशद्रोहाचा’ गुन्हा दाखल करावा, असेही मागणी आंदोलकांनी केली.

spot_img
Latest news
Related news