पोलीस अधिका-याच्या मुलाने महिलेला उडविले

एमपीसी न्यूज – रस्ता ओलांडणा-या एका 22 वर्षीय महिलेला येरवडा कारागृहात जेलर असणार्‍या अधिकार्‍याच्या मुलाच्या कारने उडवल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना 26 फेब्रुवारीला घडली होती.  याप्रकरणी  2 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकार्‍याचा मुलगा असल्यानेच गुन्हा दाखल करण्यास चार दिवसांचा विलंब लागल्याचे सांगितले जात आहे.

 

सबासायरा जोहेब शेख (वय 22, रा. संजय पार्क, विमाननगर), असे या घटनेत जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अभिमन्यू प्रदीप जगताप (वय 19, येरवडा कारागृह वसाहत, येरवडा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जखमी सबासायरा शेख यांचे सासरे मुमताज जब्बार शेख यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

सबासायरा ही 26 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास येरवडा परिसरातील एअरपोर्ट रोडवरील जेल रोड चौकीसमोरचा रस्ता ओलांडत होती. त्यावेळी भरधाव वेगात जाणा-या अभिमन्यू जगताप याच्या मोटारीने त्यांना जोरात धडक दिली. यामध्ये सबासायरा या रस्त्यावरच कोसळल्या. अभिमन्यू याने घटनास्थळी न थांबता पळ काढला. नागरिकांनी सबासायरा यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर रुग्णालयातून पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. 

 

येरवडा पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन 26 फेब्रुवारी रोजी मोटार अपघाताचा गुन्हा दाखल केला. तर, घटनेच्या दिवशीच अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर 2 मार्च रोजी जखमींनी येऊन फिर्याद दिल्याचे सांगण्यात येत आहे.

"advt"

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.