शुक्रवार, सप्टेंबर 30, 2022

टोकिओ येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय रोबोकॉन स्पर्धेमध्ये ‘सीओईपी’ भारताचे प्रतिनिधित्व करणार

एमपीसी न्यूज – माईर्स एमआयटी अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, आळंदी व दूरदर्शन (प्रसारभारती) यांच्या संयुक्त विद्यमाने 2 ते 4 मार्च दरम्यान बालेवाडी येथे राष्ट्रीय पातळीवरील ‘रोबोकॉन 2017’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे (सीओईपी) संघाने  विजेते पद मिळविले. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) हा संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेत भारतातून 122  संघ सहभागी झाले होते.

 

जपान येथील टोकिओ येथे ऑगस्ट 2017 मध्ये होणार्‍या आंतरराष्ट्रीय पातळीवरील रोबोकॉन – 2017 मध्ये सीओईपी हा संघ भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. 

 

राष्ट्रीय पातळीवरील रोबोकॉन 2017 च्या पारितोषिक वितरण समारंभासाठी कानपूर येथील आयआयटीचे माजी संचालक पद्मश्री डॉ. संजय धांडे, शिवानी मुकेश शर्मा, विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. विश्‍वनाथ कराड, मुंबई दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक शिवाजी फुलसुंदर, उषा कराड, कॅपजेमीनी इंडियाचे कार्यकारी उपाध्यक्ष किशोर विखे, मॅथवर्क इंडिया प्रा.लि.चे प्रशांत राव, रोहमचे व्यवस्थापकीय संचालक नाकामुरा दाइसुके, जेनेटीक्स इंडिया प्रा.लि.चे अतिरिक्त महाव्यवस्थापक नचिकेत जोशी, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे, एमआयटीचे संस्थापक विश्‍वस्त प्रा.पी.बी. जोशी, एमआयटीच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा कराड-नागरे, एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे कार्यकारी संचालक व रोबोकॉनचे मुख्य समन्वयक डॉ. सुनील कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एस.एन.पठाण, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेचे संचालक डॉ. बी. बी. आहुजा, आळंदी येथील एमआयटी अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. योगेश भालेराव हे उपस्थित होते.

 

राष्ट्रीय पातळीवरील ‘रोबोकॉन इंडिया 2017’ स्पर्धेमध्ये कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणेला सुवर्ण पदक डॉ. विश्‍वनाथ कराड अ‍ॅवार्ड आणि प्रा.बालकृष्णन अ‍ॅवॉर्ड देण्यात आले. तसेच एक लाख रुपयाचे रोख पारितोषिक देण्यात आले. एमआयटी संघ उपविजेते ठरला त्यांना रौप्य पदक, मुकेश शर्मा अ‍ॅवॉर्ड व 50 हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. त्याचप्रमाणे बेस्ट मॅन्युअल ऑपरेटर (वडोदरा इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग, वडोदरा), फास्टेस्ट जॉब कम्लीटिंग रोबो (सीओईपी, पुणे), बेस्ट इस्थेटिक रोबो (एमआयटी,पुणे), बेस्ट इनोव्हेटिव्ह डिझाइन (इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, निरमा युनिव्हर्सिटी), बेस्ट आयडीया (कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे), बेस्ट रूकी अ‍ॅवॉर्ड (संजीवनी  कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, कोपरगाव), बेस्ट जजेस अ‍ॅण्ड रेफरीज चॉइस अ‍ॅवॉर्ड (झाकिर हुसेन इंजीनिअरिंग कॉलेज,अलिगड युनिव्हर्सिटी) आदी पारितोषिके देण्यात आली. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे ( सीओईपी) , एमआयटी आणि वडोदरा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज इत्यादी संघांना मैथवर्क अ‍ॅवॉर्ड ट्रॉफी प्रदान करण्यात आले.

 

मुकेश शर्मा म्हणाले की, रोबोकॉन स्पर्धेमुळे संघभावना निर्माण होते. संशोधनामुळे नवीन कल्पना विकसित होऊन त्यामधून निर्माण होणारी उर्जा आपल्याला यशाकडे घेऊन जाते. नवनवीन आव्हाने आपण सहजपणे पेलू शकतो. एक चांगला विचार सर्व समाजासाठी उपयुक्त ठरू शकतो. चिकाटीने व जिद्दीने आपण काम केले तर यश निश्‍चितच मिळते.’

spot_img
Latest news
Related news