आळंदी केसरीचा पै. सुशांत फेंगसे मानकरी

आळंदीत भैरवनाथ महाराज वार्षिकोत्सवात कुस्त्यांचा आखाडा रंगला

भव्य कुस्त्यांच्या स्पर्धांसह धार्मिक कार्यक्रम उत्साहात 

एमपीसी न्यूज –  आळंदी येथील श्री भैरवनाथ महाराजांच्या वार्षिकोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांसह कुस्त्यांच्या स्पर्धा जंगी आखाड्यात मोठ्या उत्साहात रंगल्या. सत्कार आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सव उत्तरोत्तर रंगला.

भैरवनाथ महाराज उत्सवात श्रीची संदल मिरवणूक, मंदिरात काळभैरवनाथ यज्ञ सोहळा, अभिषेक, हारतुरे, मांडव डहाळे उत्साहात झाले. रात्री गावकरी भजन, श्रीचा छबिना मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात उत्साहात झाली.


यावर्षीचे आळंदी केसरीचा मान वैयक्तिक रोख रक्कमेसह चांदीची गदा 40 हजार रुपये रोख पारितोषिक सह्याद्री कुस्ती संकुलचा पै. सुशांत फेंगसे याने मिळवला. राज्यातील विविध कुस्ती संकुलातील कुस्तीगीरांच्या या कुस्त्यांच्या जंगी मैदानात कुस्त्या झाल्या.  

ज्ञानेश्वर विद्यालयाचे भव्य प्रांगणात निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानात राज्यातील नामवंत कुस्तीगीरांच्या उपस्थितीत कुस्त्यांची दंगल नागरिक-भाविक आणि कुस्ती प्रेमींना पाहता आली. प्रथम क्रमांक कुस्ती विजेत्यास एकत्रित 40 हजार रुपये रोख, चांदीची गदा जल्लोषात देण्यात आली. माजी नगराध्यक्ष दत्तात्रय कु-हाडे आणि पै. कार्तिक कुऱ्हाडे यांच्या वतीने 21 हजार रुपये आणि चांदीची गदा जाहीर केल्या प्रमाणे देण्यात आल्याचे उत्सव समिती अध्यक्ष शंकरराव कुऱ्हाडे यांनी सांगितले. याशिवाय आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलासह राज्यातील इतर भागातील नामवंत कुस्ती संकुलातील खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाल्याने यावर्षीचा कुस्त्यांचा जंगी आखाडा अधिकच रंगल्याचे कुस्ती आखाडा नियोजन कमिटीचे सदस्य पै.कार्तिक कुऱ्हाडे आणि पै.सुरेश (बापू) दौंडकर यांनी सांगितले.

उत्सवातील शेवटच्या दिवशी भैरवनाथ चौकात आळंदीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, आळंदी शहर शिवसेना महिला आघाडी अध्यक्षा मंगला हुंडारे यांच्यासह उपस्थित नगरसेवक, नगरसेविकांचा जाहीर नागरी सत्कार नारायण महाराज जाधव यांच्या हस्ते हरिनाम गजरात झाला. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सवाची सांगता झाल्याचे उत्सव मंडळाचे अध्यक्ष शंकरराव कुऱ्हाडे पाटील यांनी सांगितले.

 

 

भैरवनाथ महाराज उत्सवात पदाधिकारी, नागरिक, भाविक, कुस्ती खेळाडू आणि पंचक्रोशीतील नागरिक सहभागी झाल्याने आनंद सोहळ्यात रंगात आली. भैरवनाथ उत्सव मंडळ आणि आळंदी ग्रामस्थांच्या वतीने अध्यक्ष शंकरराव कुऱ्हाडे, संतोष भोसले, बाळासाहेब कुऱ्हाडे, आनंद मुंगसे, रमेश कार्ले, अनिल जोगदंड, सोमनाथ वाघमारे, पै. सुरेश दौंडकर, सखाराम गवळी, पै.कार्तिक कुऱ्हाडे, वस्ताद पै. विजय बराटे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

आळंदीतील भैरवनाथ महाराज वार्षिकोत्सवात भैरवनाथ मंदिरास नव्याने आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली. चौकात आकर्षक मंडप, स्वागत कमानी आणि विद्युत रोषणाईने भाविकांचे लक्ष वेधले. मंदिरावर विद्युत रोषणाईने परिसरातील नागरिकांनी कौतुक केले. पुढील वर्षीच्या कुस्त्यांचे जंगी आखाड्याची सुमारे दोन लाख रुपयांची तरतूद करणार असल्याची माहिती अध्यक्ष शंकरराव कुऱ्हाडे यांनी दिली. यावर्षीचे जमा खर्चाचा हिशोब खास देणगीदारांची थेट देणगीदार यांचे घरी तात्काळ देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.