छेडछाड करणा-यांची फोन करून तक्रार देण्याचे पोलिसांचे आवाहन!

पोलीस अधिका-यांनी दिले स्वत:चे मोबाईल नंबर

‘आपला पोलीस आपला भाऊ’; तळेगाव पोलिसांचा उपक्रम 

एमपीसी न्यूज – मावळ तालुका क्रशर उद्योजक संघाच्या सहकार्याने तळेगाव दाभाडे पोलिसांनी ‘आपला पोलीस आपला भाऊ’ हा उपक्रम सुरू केला आहे. तरुणी, महिलांची कोण छेडत काढत असेल तर त्याची तक्रार करण्यासाठी पोलीस अधिका-यांनी आपले मोबाईल नंबर दिले आहेत.

शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्टेशन, बस स्थानक अशा ठिकाणी उभे राहणे काही टवाळखोर तरुणींची, महिलांची छेड काढतात. मोबाईलवरून छायाचित्र काढणे, अश्लिल बोलणे, संदेश पाठविणे, बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन शरिराशी लगट करणे, दुचाकीवरून मुलींचा पाठलाग करणे, टॉण्ट मारणे, शिव्या देणे, असे प्रकार वारंवार घडत असतात, अशा टवाळखोरांची तक्रार करण्यासाठी तळेगाव-दाभाडे पोलिसांनी आपले मोबाईल क्रमांक जाहीर केले आहेत. कोण छेड काढत असेल तर फोन करून त्याची तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

छेड काढणा-याच्या वाहनाचा नंबर, ठिकाण आणि त्याचे नाव तळेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील 9767506633, पोलीस उपनिरीक्षक लांडगे 9923795826, दिलीप डोळस 9850657504 आणि सुरेश शिंदे 9561796043 या क्रमांकावर फोन करून सांगण्याचे आवाहन, पोलिसांनी केले आहे.

"advt"

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.