गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिम्मित कामगारांनी घेतली सुरक्षेची शपथ

बांधकाम प्रकल्पावर राबविले बालवाडी व आरोग्य शिबिर

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त बांधकाम कामगार सेना व असंघटित कामगार विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज (शनिवारी) बांधकाम प्रकल्पावर सुरक्षा साधनांचे विधिवत पूजन करून कामगारांना सुरक्षाविषयक माहिती व शपथ देण्यात आली.

 

यावेळी बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष जयंत शिंदे, कार्याध्यक्ष सुभाष माछरे, सरचिटणीस सचिन गुंजाळ, असंघटित कामगार विकास संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक उज्वला गर्जे, गंगा सेन आदी उपस्थित होते.

विविध बांधकाम प्रकल्पावर कामगारहिताचे उपक्रम राबविण्यात आले. तसेच चिखली येथे मे. डिवाईन या बांधकाम प्रकल्पावर सुरक्षा विषयी माहिती देण्यात आली. कामगारांच्या मुलांसाठी बालवाडीचे उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर बांधकाम प्रकल्पावर कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर राबविण्यात आले. त्यामध्ये 316 बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

Latest news
Related news