निगडीत साडेतीन वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; अल्पवयीन मुलगा ताब्यात

एमपीसी न्यूज – दुकानातून घरी जात असणा-या एका साडेतीन वर्षाच्या मुलीला स्वच्छतागृहात नेऊन एका अल्पवयीन मुलाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही धक्कादायक घटना आज (रविवारी) दुपारी दोनच्या सुमारास निगडी परिसरात घडली. 

 

या प्रकरणी अल्पवयीन मुलावर बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

आरोपी हा निगडी परिसरात कामाला असून तो चिखली येथे राहत आहे. पूर्वी तो निगडी परिसरात वास्तव्यास होता. पीडित मुलगी रविवारी दुपारी दोनच्या सुमारास चॉकलेट आणण्यासाठी दुकानात गेली होती. दुकानातून परत घरी जात असताना आरोपीने दुचाकीवरून येऊन तिला बाजूला असणा-या स्वच्छतागृहात नेले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलगी रडत घरी गेली. तिने आपल्यासोबत घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर आईने पोलिसात धाव घेत आरोपी विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

निगडी ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी तपास करत आहेत.

"advt"

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.