सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

पुण्याच्या महापौरपदासाठी भाजपतर्फे मुक्ता टिळक

गटनेतेपदी श्रीनाथ भिमाले यांची निवड; सोमवारी अधिकृत घोषणा

एमपीसी न्यूज- पुणे महापौरपदाची निवडणूक 15 तारखेला होणार असून भाजपतर्फे महापौरपदासाठी मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर गटनेतेपदी श्रीनाथ भिमाले यांची निवड करण्यात आली आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तर याबाबत सोमवारी भाजपकडून अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

 

पुणे महापालिका निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर भाजपतर्फे महापौरपदासाठी कोणाला संधी देण्यात येते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. यामध्ये मुक्त टिळक यांच्या नावाची जास्त चर्चा होती. तसेच राष्ट्रवादीतून ऐनवेळी भाजपात प्रवेश केलेल्या रेश्मा भोसले यांनीही महापौरपदासाठी इच्छा व्यक्त केली होती. 

आज मुंबईत झालेल्या बैठकीत मुक्ता टिळक यांना महापौरपदासाठी उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला तर गटनेतेपदी श्रीनाथ भिमाले यांची निवड करण्यात आली. उद्या सोमवारी याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

"advt"

 

 

spot_img
Latest news
Related news