घरगुती गॅस सिलेंडरच्या भाववाढीविरुद्ध आपतर्फे पुण्यात निषेध

एमपीसी न्यूज – घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात झालेल्या दरवाढीचा काल (दि.5) पुणे मनपा बसस्थानकावर हातात निषेधाचे फलक घेऊन आम आदमी (आप) पक्षातर्फे जाहीर निषेध करण्यात आला.

घरगुती एलपीजी गॅस सिलेंडचे दरवाढून 490 रुपयांवरून चक्क 777 रुपयांवर गेले आहेत. त्याच्या निषेधार्थ या आंदेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आंदोलनात  विजय गायकवाड, एस एम् अली, तुषार कासार, आनंद यादव, आशुतोष शिपलकर, किशोर मुजुमदार, दत्तात्रय कदम, राजेंद्र वराडे, चेतन बेंद्रे, तगतसिंग, महेश स्वामी, राजेश चौधरी,  संदीप सोनावणे, पुरोहित, अनंत कुलकर्णी, प्रशांत थटार, सावन राउत, सतीश यादव, फ्रैंकी मेंडोंसा,  उमेश वह्याडे, सुहास पवार, अजिंक्य शिंदे, निखिल खळे, मुकुंद किर्दत आदींनी सहभाग घेतला होता.

यावेळी बोलताना आपचे मुकुंद किर्दत म्हणाले की, मागील वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात ऑईल ब्यारेलचे दर कोसळले असताना पेट्रोलचे भाव मात्र चढेच राहिले. दुसरीकडे गेल्या सहा महिन्यात गॅस सिलेंडरचे भाव तब्बल 58 टक्क्यांनी वाढले आहेत. या अभूतपूर्व भाववाढीने मध्यमवर्गीयांच्या खिशाला मोठी चाट बसणार असून ‘सबसिडी नाकारा आणि गरिबाचे घर सावरा’ या आवाहनातील पोकळपणाही उघड झाला आहे.

उत्तर प्रदेशात सरकार आल्यास त्यांना कर्जमाफी देऊ, असे सांगताना महाराष्ट्रात भाजपाचेच सरकार असून, सर्वाधिक शेतकरी आत्महत्या मागील वर्षात झाल्याचे पूर्ण विसरून गेले आहेत. मोदी सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरताना दिसत आहे. यापूर्वी सिलेंडर भाववाढीवर आंदोलन करणारे भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे नेतेही सामन्य जनतेच्या अडचणीबाबत बेफिकीर असून ‘पद –सत्तेच्या खेळा’त मश्गुल आहेत, अशी टीकाही किर्दत यांनी यावेळी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.